PrintSource

उमटल्या क्षितिज रेषा

Umatalya Kshitij Resha

विजय बोंद्रे

उमटल्या क्षितिज रेषा
या गर्द क्षितिज रेषा

विराट वाळवंटाच्या रखरखीत वाळूवरती
उमटल्या क्षितिज रेषा
या गर्द क्षितिज रेषा

तिरीप उन्हाची,
भोवळलेला कुणी पांथस्थ कण्हला, रडला
गरगर भोवर्‍या मधे अडकला

पाऊल थकले,
अडखळलेला तरी तृषेने आसुसलेला
मृगजळ भुलवी, तहानलेला